
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
वाघोली, कोंढापुरी दि.21 कोंढापुरी येथील विविध विकास सोसायटी चेअरमन पदी मा. सरपंच श्री स्वप्निल भैया गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, सोसायटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवून शेतकऱ्यांच्या विकास वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी उरळगाव ग्रामस्थ तर्फे मा सरपंच श्री गजानन जांभळकर, सोसायटीचे चेअरमन श्री भरत आफळे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भाऊ कोकडे, ग्रा.पंचायत सदस्य मोहन सात्रस, घोडगंगा सह. सा. कारखाना कर्मचारी संजय जांभळकर, युवराज वायदंडे यांच्यातर्फे यथोचित सत्कार करून,अभिनंदन करण्यात आले.