
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी चिखलदरा मेळघाट-प्रवीण मुंडे
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप 2023 चेआयोजन मेळघाटातील पायविहीर
येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते व हे आयोजन
तालुकास्तरीय होते. हे आयोजन निवासी असून पहिल्या बॅचचे प्रसिक्षणं अतिशय उत्साहात पार पडले यामध्ये गट शेतीच्या माध्यमातून ज्ञान आणि विज्ञानाच्या आधारे नैसर्गिक संसाधनांचा वापर
करून पिकांच्या पूर्वमसागत ते काढणीपर्यंत कमी खर्चात
उत्पन्न वाढीच्या नवनवीन पद्धती स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस sop
च्या आधारे प्रशिक्षण होते सोबतच उत्कृष्टकाम करणाऱ्या गटांना राज्य व तालुका पातळीवर विविध पारितोषिक दिल्या गेले यात 14 गावांनी भाग घेतला असून पन्नास च्या वर शेतकऱ्यांनी हेप्रशिक्षण पूर्ण
केले यात दहेंद्री गावातील गट प्रथम स्थानी राहिला यात दहेंद्रीचे प्रतिनिधित्व अनिल पोटे सहदेव येवले नामू कासदेकर व् मनीषा कासदेकर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
संतोष सर पंढरी सर सरिता मॅडम व कल्याणी मॅडम यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले