दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:-नांदेड जिल्हातील आत्महत्या केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासना कडून आज पर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे आम्ही हे जनहितांचे कार्य म्हणून आपल्या सेवेत प्रथम दिनांक २३/०१/२०१९ पासून पुढे तीन दिवस आपल्या जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयापुढे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला व त्यांचे लहान लहान मुले त्यांची आई सासू-सासरे वृद्ध सरासरी २००.नागरिक आपल्या कार्यालयापुढे तीन दिवस आमरण उपोषण करण्यात आले लेखी निवेदन संबंधित सर्व मंत्री व प्रशासनाकडे वेळोवेळी विनंती अर्ज सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव ,पांडुरंग कंधारे, गजानन जाधव ,शरद गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे दरमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी केली आहे
