दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा-जवर्डी-भोकरी मार्गावरील पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून सदर बांधकाम बंद करून कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
सदर बांधकाम ३०५४ (गट ब) अंतर्गत येत असून ही कामे लोकप्रतिनिधी सुचवीत असतात.३०५४ (गट ब) अंतर्गत तयार होत असलेल्या पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून अधिकारी व कंत्राटदार मिळून जनतेची दिशाभूल आणि शासकीय योजनेचा बट्याबोळ करीत असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे.विकास करणे सोडून पुलाचे थातूरमातूर काम करून स्वतःचा विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही गावकरी बोलत आहेत.
सविस्तर वृत्त असे की,घोगर्डा-जवर्डी-भोकरी येथील गावकऱ्यांचा नेहमीचा ये-जा करण्याचा मार्ग असणाऱ्या ग्रामस्थांनी रविवार दिनांक २ एप्रिल रोजी बांधकामस्थळी चक्क डाबरमाथा पुलाचे काम होत असताना दिसले.या संबंधित साहेब पुलाचे काम एकदाच होईल साहेब परत परत कामाला निधी मिळणार नाही साहेब…असे गावकऱ्यांनी म्हटले.तसेच या कामावर रेती तर वापरण्यात आलीच नाही.परंतु हा पूल बांधकाम सुरू करण्याअगोदरच अशा बांधकामामुळे भविष्यात नागरिकांच्या सोयी सुविधेचा प्रश्न प्रश्नांकित झाला आहे.
या जीवघेणी पुल बांधकामाचे काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार बळवंत वानखडे यांनी भूमिपूजन केल्याचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले असून संरक्षण भिंतीसह मजबुतीकरण करणे २० लक्ष रुपयांचे काम करण्यात येत आहे.या कामात मुरूम न वापरता माती वापरण्यात आली आणि येणारे वाहते पावसाचे पाणी व पुलाची उंची समसमांतर होत असून पावसाळ्यात नागरिकांच्या सुवेधेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकारी आणि ठेकेदार संगममताने संबंधित कामाचा मलिदा लुटत आहेत आणि लोकप्रतिनिधींनी ह्याकडे लक्ष द्यायला हवे असेही गावकरी बोलत आहेत.
—————————————-
या पुलाची पहाणी केली असता,या पुलाचे बांधकाम येथील नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जीव घेणे असल्याचे निष्पन्न होत आहे.जर असे निकृष्ट दर्जाचे काम करीत असाल आणि शासनाचा पैसा घशात घालण्याचे काम अधिकारी वर्ग करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही.
– मुन्ना इसोकार शहराध्यक्ष
शिवसेना
वरिष्ठांना सांगून सुद्धा आज उद्या त्या कामात सुधारणा करतील असे वाटले.परंतु शासनाचे संपूर्ण पैसा खिशात घालण्याचे काम अधिकारी ठेकेदारी वर्ग करीत आहेत.रेती न वापरता १०० डस्ट वापरण्यात येत आहे.तसेच सर्कस झुल्याप्रमाणे या पुलाचे काम येथे सुरू असून कामात मुरूम न वापरता चक्क माती वापरण्यात येत आहे.
– बाळासाहेब रोंघे
तालुकाध्यक्ष प्रहार चालक-मालक संघटना
आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करीत आहोत आम्हाला बाकी काही घेणेदेणे नाही.आम्ही इस्टिमेट प्रमाणे काम करीत आहोत रेतीघाट बंद असल्याने अधिकाऱ्यांनीच आम्हाला डस्ट वापरण्याची परवानगी दिली आहे.
– ठेकेदार
