
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- दि.23 रोजी समाजातील अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात कायद्याने बंधने आली असली तरीही प्रस्थापित व्यवस्था सूप्तपणे डोके वर करू पहाते अशा प्रसंगी समाजाने संघटीत पणे याचा प्रतिकार करत प्रहार करावा असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
मौजे धानोरा(खू.) येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित सभेत प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. उत्तम महाराज धानोरकर होते.तर प्रमूख पाहूणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर अंधोरीकर,विद्रोही कवी राजेंद्र कांबळे,बोधीसत्व फाऊंडेशनचे प्रा.बालाजी आचार्य,स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे, छत्रपती क्रिडापूरस्कार विजेते धर्मपाल गायकवाड,युवा नेते महेंद्र ससाणे, डॉ.बालाजी थिट्टे,लखन गायकवाड, सरपंच प्रभाकर वाकडे,पोलीस पाटील विश्वनाथ नाकसाकरे, त्रिशरण वाघमारे,उत्तम लोखंडे, ग्रामविस्तारधिकारी गुंडेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर अंधोरीकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण झाले. त्यानंतर प्रा.बालाजी आचार्य यांनी त्रिशरण पंचशिल दिले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना युवक नेते डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी पूढे म्हणाले की,जयंती सोहळा अतिशय उत्साहात पार पाडला जातोय मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासून आपण दूर तर जात नाही ना याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच युवकांनी व्यसनमुक्त होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावा. तसेच जयंती ह्या प्रबोधनाचे माध्यम असुन यातून समाजा समोरच्या विविध प्रश्नांची चर्चा व्हावी या चर्चेतूनच सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न व्हावा.तसेच आपले जीवन सदाचारी ठेवून इतरांपूढे आपला आदर्श ठेवावा असे अवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष दीपक गायकवाड जयंती मंडळाचे सदस्य आनंद गायकवाड,राष्ट्रपाल वाघमारे, महेंद्र गायकवाड,कैलास गायकवाड, नितीन वाघमारे, विनोद वाघमारे,बिटु गायकवाड, सुनिल गायकवाड, मिलींद गायकवाड, मेजर दिपक गायकवाड,शरद गायकवाड,दगडु ढवळे, नामदेव गायकवाड,पवन गायकवाड,तातेराव गायकवाड,आदींनी पूढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंती मंडळाचे उपाध्यक्ष दिपक गायकवाड यांनी मानले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांची समायोचीत भाषणे झाली.
यावेळी मोठ्या प्रमाणात समाजबांधव व गांवकरी उपस्थित होते.