दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
शहरातील देऊळगल्ली येथील जेष्ठ महिला विमलबाई गुरूनाथ आप्पा किलजे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै.विमलबाई गुरूनाथ आप्पा किलजे यांच्या पार्थिवावर काल दि.२३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता लोहा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शहरातील, व्यापारी, कर्मचारी, नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लोहा शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
