दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:तालुक्यात तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. त्याचबरोबर महागाईही गगनाला भिडलेली असतानाच आता लाल मिरची ही आणखी तिखट झाली आहे. दोन महिन्यापूर्वी २०० रुपयावर असणारी लाल मिरची सध्या २५० ते २८० रुपयांवर पोहोचली आहे. मागील काही दिवसांमध्ये बाजारात आवक कमी झाल्याने लाल मिरचीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लाल मिरची आणखी तिखट झाली आहे..
उन्हाळ्यात प्रत्येक घरी महिला वर्षभरासाठी लागणारे तिखट, मसाला व इतर पदार्थ तयारकरीत असतात. त्यामुळे या दिवसात मिरचीची मागणीही वाढलेली असते. मात्र या वर्षीमिरचीचे उत्पादन घटल्यामुळे मोठ्या प्रमाणातभाववाढ होत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीहीमिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पाऊस तसेच विविध रोगामुळे उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे सध्या बाजारामध्ये मिरचीचे दर २५० ते २८० रुपये पर्यंत आहेत. काही ठिकाणी भाव कमी अधिक आहेत. त्यातही वाळलेल्या आणि अधिक तिखट दर्जा पाहून दर आकारला जात आहे. परिणामीमहागाईचा फटकाबसत आहे. पावसाळ्याला काही महिन्याचाकालावधी शिल्लक असल्याने भाव आणखी३०० रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता काही व्यवसायिकांनी दैनिक चालू वार्ता पेपरला व्यक्त केली आहे.
