दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
वाळु व मुरुम वाहतुकीचा बोजवारा
देगलूर:बिलोली तालुक्यातील गतवर्षी शासनाच्या नियमा प्रमाणे वाळूसाठा केलेल्या वाळूची वाहतूक करण्यास जे नियम घालून दिले आहेत,त्या नियमांना तिलांजली दिलीबजात असू येथील महसूल विभागाचा कारभार म्हणजे “अंधेरी नगरी चौपट राजा” असा झाला आहे.
तालुक्यातील येसगी,बोळेगाव व गंजगाव येथील रेती घाटावरून गतवर्षी शासनाच्या नियमानुसार वाळूचा साठा करून ठेवण्यात आला होता.परंतु दिलेल्या परवानगी पेक्षा जास्तीचा साठा असल्याने व दिलेली मुद्दत संपल्याने येसगी,गंजगाव व बोळेगाव येथील साठा जैसे थे राहिला आहे.परंतु गेल्या महिन्यात येसगी व गंजगाव येथील ठेकेदारांना साठा उचलण्याची शासनाने नवीन नियमाच्या अधीन राहून वाळू उचलण्याची व वाहतूक करण्याची परवानगी दिली.त्यात ज्या वाहनातून वाळू वाहतूक करण्यात येणार आहे त्या वाहनाचा नंबर, कुठून कुठे वाहतूक करणार आहे त्यासाठी त्या वाहनाला “जीपीएस”बसवून पावतीची इनवाईस करणे अनिवार्य केले.परंतु वाळू ठेकेदारांनी या सर्व नियमाला बगल देत या तिन्ही नियमांचे उल्लंघन केले.मुळात शासनाने नियम घालून दिले असले तरी या नियमांची अंमलबजावणी मात्र उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, संबंधित नायब तहसीलदार,मंडळाधिकारी व संबंधित गावचा तलाठी या पैकी एकानेही अंमलबजावणी केली नाही. त्याच बरोबर येसगी व गंजगाव येथील ठेकेदारांनी तर कांही वाहनांना रायल्टीच्या पावत्याही दिल्या नाहीत. तरीही बिनदिक्कत पणे उजळ माथ्याने वाळूची वाहतून कार्यालयाकडून होत आहे.विशेष म्हणजे वाळू सोबत मुरूम उत्खनन व काळीमाती उत्खनन व वाहतुकीच्या बाबतीतही असाच प्रकार होत आहे.असाच प्रकार मुरूम व काळीमाती उत्खनन बाबतीत वाळूसारखाच राहिला आहे.मातोश्री पांदण व पालकमंत्री पांदण रस्तासाठी मुरूम उत्खनन व कुंभार समाजाच्या नावाने काढून राहेर, कोळगाव,चिरली,टाकळी,येथील वीट भट्टी कारखण्यावर काळ्या मातीचा साठा केला जात आहे.या बाबतीत तक्रारी झाल्या की महसुलाच्या अधिकारी संबंधित तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यापेक्षा संबंधित ठेकेदाराला तक्रारदाराला भेटून समाधान करण्याचा सल्ला देतात.तालुका त्यामुळे बिलोली येथील महसूल विभागाचा कारभार म्हणजे ” अंधेरी नागर चौपट राजा”असाच झाला आहे.
