
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा
उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे मंठा शहाराच्या विविध रस्त्यांवरील व ग्रामीण भागातील रस्त्याच्याकडेला रसवंतीगृहे गर्दीने फुलली आहेत. उष्णतेने शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे थकवा जाणवतो मात्र उसाचा ताजा रस प्यायल्याने सगळा ताणतणाव, थकवा दूर होऊन मनात नवचैतन्य संचारते, अशी प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत.
उन्हाचा चटका वाढला तशी रसवंतीतील लगबग वाढली आहे. उष्णता कमी करून थकवा दूर करणारे सर्वांचे आवडते पेय म्हणजे उसाचा रस. शहरात काही दिवसांपासूनच रसवंत्या थाटण्याल्या असुन उन्हाचा पारा वाढताच रसवंतीतील गर्दी वाढू लागली आहे. शहरातील विविध भागा रसवंतीची दुकाने थाटलेली आहेत. काही गरीब कुटुंब हातगाड्यावर उसाचा रस विकून उदरनिर्वाह करतात. बर्फ टाकलेला उसाचा रस 10 रु. ग्लास तर बिनाबर्फाचा 15 रु. ग्लास मिळतो.
आपल्याकडे उसाच्या रसात लिंबू आणि काळे मीठ टाकून त्याची रंगत वाढवली जाते. हाताने रस काढताना होणारे शारीरिक श्रम वाचवण्यासाठी रसवंतीच्या धर्तीवर हातगाड्यांवरच आकाराने लहान मशीनचा उपयोग होऊ लागला आहे. दिवसाला दोन ते तीन लिटर इंधनाचा वापर करून मशीनद्वारे रस काढला जातो. काही रसवंत्या वर्षभरही चालवल्या जातात. तर उन्हाळ्यात व्यवसाय म्हणून चार महिन्यांसाठी गुंतवणूक करून रसवंती थाटणाऱ्यांची संख्याही वाढल्या आहेत