
दैनिक चालु वार्ता गंगापुर प्रतिनिधि-अमोल आळंजकर
गंगापुर प्रतिनिधि – शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाने गंगापुर शहरासह तालुक्यास झोडपून काढले.या पावसाने उन्हाळी बाजरी,कांदा, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे शेतकर्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक ठीकानी झाडे उन्मळून पडली आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
आंबेवाडी गावातील अविनाश पानकडे यांनी एक दिवस अगोदर आपल्या शेतातील कांदा काढला होता परंतु कालच्या पावसाने काढलेल्या कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.आणि वादळी वार्यामुळे त्यांची संपुर्ण उन्हाळी बाजरी आडवी पडली आहे