
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठं धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 15 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.