
दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यातील शिवणी येथील वन विकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र कार्यालया समोर मागील २० दिवसखाली मोठ्या प्रमाणात जिवंत सागवान झाडांची कत्तल करून आणून टाकण्यात आली होती. सदरील सागवान झाडे हे कटाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांची कोणत्याही प्रकारचे परवाना न घेता.लाखो रुपयांची सागवान कार्यालय समोर आणून टाकण्यात आले होते.या सर्व घटनेची वरिष्ठ स्थरावर चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करुन कायदेशीर कारवाई करावी या साठी येथील वनप्रेमी शेख जुनेद शेख मेहताब यांनी दि.२४ एप्रिल रोजी वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रारी निवेदन दिले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, शिवणी वन विकास महामंडळ वनपरिक्षेत्र कार्यालया समोर मागील काही दिवसांपूर्वी मौल्यवान सागवान झाडांची मोठ्याप्रमाणात कटाई करून आणून टाकण्यात आले होते. या मौल्यवान सागवान लाकडांच्या संदर्भात येथील कर्मचाऱ्यांना माहिती मागितली असता कार्यालया समोरील सागवान वृक्ष तोड हे गोंडजेवली बिट कक्ष क्र.२८०,२८१,२८२ मधील असून वारी मोड,सह इतर सागवान जमा करून आनण्यात आले.या विषयी कोणत्याच प्रकारची सागवान परवाना नाही, आणि कोणाचे आदेश ही नाहीत व या संबंधी कोणत्याही प्रकारचे कायदेशीर बाबी नाहीत तर दुसरी कडे संबधित वनरक्षक चार दिवसाची सुट्टी घेतली की सुट्टीवर पाठवण्यात आले होते.या वरून कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्याने सदरील मौल्यवान सागवान कटाई बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना विचारणा केले असता,उडवा उडवी ची उत्तरे मिळाली एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची तोड होते आणि, या संदर्भात कोणतीच कायदेशीर बाबी नाहीत तर सदरील मौल्यवान सागवान माल हे अधिकारी आणि कर्मचारी यांनी माल लंपास करून लाखो रुपये गिळकंत करण्याचा प्रयत्न झाला की काय असा प्रश्न सर्रास निर्माण होत आहे. कुंपनच शेत खात असेल तर नेमके दाद मागावी तर कुठे असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. करिता वनप्रेमी शेख जुनेद शेख मेहताब यांनी सदरील माहिती वनविकास महामंडळ किनवट येथील विभागीय व्यवस्थापक व साहाय्यक व्यवस्थापक यांना दि.०८ एप्रिल रोजी सदरील प्रकरणाची पुराव्यासह संपूर्ण माहिती देण्यात आली
परंतु त्यांच्या कडून देखील या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने विभागीय व्यवस्थापक देखील यात मिली भगत करून प्रकरण दाबन्याच्या प्रयत्नात असल्याची शंका आल्याने तक्रार कर्त्याने थेट नागपूर गाठून तक्रार दाखल केली
पण संबंधित अधिकाऱ्याने दुर्लक्षित केल्याने अखेर हा लाखो रुपयांचे मौल्यवान सागवान बेकायदेशीर कटाई करण्यात आलेल्या वनसंपदा अधिकारी व कर्मचारी मिळून गिळकंत करण्याचा बेतात होते की काय असा प्रश्न निर्माण झाल्याने,अखेर दि.२४ एप्रिल रोजी वनविकास महामंडळ चे मुख्य कार्यालय (एफडीसीएम ) भवन नागपूर येथे व्यवस्थापकीय संचालक मुख्य महाव्यस्थापक महा व्यवस्थापक यांच्याशी सदरील घटनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.