
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
🎆 सकाळी आठ ते चार वेळेत
जि. प. प्रशाळा येथे मतदान
सायं पाच वाजता मतमोजणी
७०कर्मचारी कामात ६२ उमेदवार रिंगणात
मंठा..अत्यंत चुरशीची लढत व प्रतिष्ठिची
असलेल्या मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीकरीता आज सकाळी आठ ते चार वाजता दरम्यान मतदान होत आहे. यात६२ उमेदवार आपले भाग्य अजमावणार आहेत. १८ संचालकाकरिता निवडणूक होत आहे. मंठा येथील जि. प. प्रशाळेत मतदानाकरीता सुसज्ज व्यवस्था ७० कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सोबतीने सज्ज आहे.
जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राजकीय रंगाने रंगात आली आहे. राजकीय डावपेच अंतिम टप्प्यात आले असून स्थानिक ठिकाणचे उमेदवार मतदारांच्या घरी पोहचले आहे. राजकपक्षीय बंधने झुगारून थेट आपल्या व जवळच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात येत आहे. उमेदवारांच्या प्रचाराने मतदार राजा संभ्रमित झाला असून क्रॉस वोटिंग चे प्रमाण स अधिक राहण्याची शक्यता आहे.
मतदान व्यवस्था
मतदारांना मतदान करताना अडचण होऊ नये याकरीता जी.प. प्रशाळेत सहा केंद्रावर मतदान व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
🎆पैशाचा बोलबाला
सहकारातली निवडणूक म्हटली की पैशाचा बोलबाला असतोच!. मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवारांनी मतदारांना रिजवीण्याकरिता राजकीय रसद पोहोचता केलीअसून रात्र वैऱ्याची म्हणण्याची पाळी येऊ दिली नाही.
🎆 [पहिल्या फळीतील नेते कामाला]
निवडणूक जरी कृषी उत्पन्न बाजार समितीची असली तरी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पहिल्या फळीतील मोठे नेते निवडणुकीच्या रणधुमाळीत सक्रिय झाले आहेत.भाजप व शिंदे गट एकत्र तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट तिघे मिळून तर बहुजन वंचित आघाडी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. ही निवडणूक व निकाल पुढच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात आहे.
🎆[डावपेचाचे समीकरण]
जिल्ह्यातील सहकार नेते व राजकीय नेते आपापले डावपेच आखून उमेदवाराना सतर्क करीत आहेत. कोणत्या गावची ग्रामपंचायत किंवा सेवा सहकारी संस्था आपल्याला मतदानकरेल याचा तंतोतंत अभ्यास उमेदवारापर्यंत पोहोचलेला आहे. दि.३०एप्रिलला मतमोजणी सायं पाच वाजतापासून स्वप्नदीप मंगल जि. प. प्रशाळा येथे मतमोजणी होणार आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांची ही प्रतिष्ठा पणाला नुसत्या नेत्याचीच प्रतिष्ठा पणाला लागली नसून कार्यकर्त्यांची सुद्धा प्रतिष्ठा डावावर लागली आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरीता वाटेल ते प्रयत्न सुरू आहेत.
🎆बाजार समितीच्या निवडणुकीकरिता उमेदवार व मतदारांनी शांत पूर्ण
वातावरणात मतदान पार पाडावे. निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज असून सकाळी आठ ते चार पर्यंत मतदान नियोजित आहे. जि. प. प्रशाळा मंठा येथे मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे.
संजय भोईटे
निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा