
दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी- आनंदा वरवंटकर
कंधार / वरवंट :- कंधार तालुक्यातील मौजे वरवंट येथे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य महामानव ,विश्वरत्न बोधिसत्व, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 29 एप्रिल 2023 रोजी 132 वी जयंती मौजे वरवंट येथे मोठ्या उत्साहात व हर्ष उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी 10 वाजता बौद्ध समाज मंदिर येथे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही प्रतिमेचे पूजन जि प सदस्य विजय धोंडगे व ग्रामसेवक एच एस डावकोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजारोहणाचे ध्वजारोहण गावचे सरपंच सौ सुशिलाबाई सोपान सोनकांबळे, उपसरपंच यांचे प्रतिनिधी अप्पाराव गंगाधर वडजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात ग्रामपंचायत सदस्य श्री बालाजी नारायण तेलंगे, जळाबाई नामदेव वाघमारे, गावातील नागरिक तंटामुक्ती अध्यक्ष निळबा डाके,सेवानिवृत्त OS गोपीनाथ गिरी,मा. उपसरपंच गणपत वडजे,वसंत जोशी, व सरपंचांचे प्रतिनिधी सोपान गोविंद सोनकांबळे, श्री गोधने, सर्व बौद्ध उपासक उपाशीका गावचे सेवानिवृत्त इंजिनीयर धम्मचार्य श्री सूर्यकांत विठ्ठल वाघमारे, बौद्ध उपासक उपाशीका बालक बालिका व सर्व भीम अनुयायी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते पंचशील त्रिशरण ग्रहण करून जयंती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष जयंती मंडळाचे सर्व सदस्य सर्व नागरिक धम्म मित्र नामदेव वाघमारे, बालाजी टोम्पे, हैबती टोमके, राम टोमके, एकनाथ वाघमारे, नारायण टोमके, चांदू वाघमारे, रामा वाघमारे, राजू वाघमारे, यादव वाघमारे, शंकरराव वरवंटकर, मालू माधव वडजे, मारुती वाघमारे, साहेबराव लोहबंदे व ठीक 4 वाजता गावातील मुख्य रस्त्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची (तैल चित्राची )भव्य मिरवणूक काढण्यात आली अशा प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.