
दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भूम:-प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने पोलीस भरतीमध्ये उज्वल यश मिळवणाऱ्या शहरातील विद्यार्थिनी मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाल्या त्या निमित्ताने मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नेहा साबळे, निकिता साठे ,प्रीती कुंभार यांचा त्यांच्या पालकासमवेत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. थ्री एस अकॅडमीच्या माध्यमातून मागील तिन वर्षापासुन पासून या विद्यार्थिनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांनी शारीरिक, बौद्धिक कसरत करून पोलीस भरतीमध्ये स्वतःला तयार करून घेतली. पोलीस या पदावर त्यांनी यश संपादन केले. आई-वडिलांचा स्वप्न या मुलींनी साकार केलं यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उद्योजक संजय साबळे, सुरज गाढवे,उद्योजक अशोक साबळे, बालाजी अंधारे ,सुरेश साबळे,बाळासाहेब साठे ,प्रदीप चौधरी ,सुनील साठे ,पत्रकार धनंजय शेटे यांचे सह पालक उपस्थित होते.