
दै .चालु वार्ता परंडा प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परंडा-तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अनाळा या ठिकाणी आनाळा गावातील पुणे स्थित शिक्षण प्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. एस व्ही पाटुळे असोसिएटस आणि आर एन मोटर्स बाणेर पुणे यांच्या तर्फे आनाळा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले एस व्ही पाटुळे असोसिएटस आणि आर एन मोटर्स बाणेर पुणे यांचे साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार सन्मान करणे हे सहावे वर्ष आहे
इ१०वी वर्गात पास झालेले न्यु हायस्कुल आनाळा चे गुणवंत विद्यार्थींनींचा गौरव व सन्मान करण्यात आला , १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थींनींना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम पाटुळे( एस. व्हि . पाटुळे असोसिएट्स पुणे) व राहुल शिंदे( आर एस मोटर्स पुणे) अनिल शिंदे यांनी केले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदेश तापकिर हे होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केमदारने सरांनी केले तसेच बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ व नविन शिक्षकांचा स्वागत समारंभ करण्यात आला
आनाळा गावातील सरपंच जोतीरान क्षीरसागर ,निशिकांत क्षीरसागर शालेय समिती अध्यक्षा जुलेखा शेख ,विद्यार्थी पालकवर्ग, आनाळा गावातील ग्रामस्थ , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनाळाचे मुख्यध्यापक शिक्षक साळुंके सर्व शिक्षक शिक्षका उपस्थित होते
तसेच कार्यक्रमाला सर्वच उपस्थित विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांना पावभाजीचा अल्पोउपहार देण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनाळा शिक्षक शिक्षिका यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत आणि आभार व्यक्त करण्यात आले..