
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
आज दिनांक 01.07.2023 रोजी मौजे – खामगाव, तालुका म्हसळा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती, म्हसळा यांचे संयुक्त विद्यमाने कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. सरपंच प्रियंका निंबरे, ग्राम पंचायत सदस्य- नेत्रा नवघरे मॅडम , एकनाथ खामगावकर, मा. तालुका कृषी अधिकारी श्री राजेंद्र ढंगारे साहेब, पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री – मंगेश साळी, कृषी विस्तार अधिकारी श्री गणपत बाक्कर, कृषी पर्यवेक्षक श्री रामेश्वर मगर, कृषी सहायक श्री गणेश देवडे, कृषी सहायक श्री.धनंजय सरनाईक, ग्रामसेविका-श्रीमती निलम सुतार, गाव अध्यक्ष – रोशन पारावे, पोलिस पाटील सोनघर- नितेश लांबे, प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण सावंत तसेच खामगांव पंचक्रोशितील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री राजेंद्र ढंगारे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीरण, पी एम किसान योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, महाडीबिटी अंतर्गत विविध योजनांची माहिती दिली आणि भाजीपाला बियाणे किट वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री मंगेश साळी यांनी पंचायत समितीच्या कृषी यांत्रिकीकरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि इतर योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाअंती सरपंच यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला…