
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
काल दिनांक ४-७-२०२३ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी दिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे. पुं) ता.गंगापूर जि. छ. संभाजीनगर येथे विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण व गुणवंतांचा सत्कार व शर्करातुला करण्यात आली. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी चे केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रा.जे.एम.खान सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.संचालक अजीवन शिक्षण विभाग डॉ. बा. आ.विद्यापीठ संभाजीनगर चे प्रा.डॉ.जी.टी.देवगावकर उपस्थित होते. सर्वप्रथम श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी चे ज्येष्ठ स्वांतत्र सेनानी, संस्थापक व संचालक, दिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांची भाषणे यावेळी घेण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांचे बालपण त्यांचे शैक्षणिक कार्य राजकीय प्रवास याविषयी सविस्तर माहिती सांगून अभिवादन केले.शालेय समिति अध्यक्ष प्रा.रविंद्र खरात यांनी साहेबांचा वक्तशीरपणा त्यांचे लवकर उठून लिखाण करणे, व्यायाम करणे त्यांच्या सवयी याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.जी.टी.देवगावकर सरांनी साहेबांच्या सोबत असताना आलेले अनुभव कथन केले साहेबांची एकनिष्ठता , एक पक्ष एक झेंडा. साहेबांचा इतरावर असलेले प्रेम साहेबांच्या लिखाणाविषयी,मोर्चा विषयी सविस्तर माहिती, सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जे.एम.खान यांनी साहेबांच्या कार्याविषयी छोटे छोटे किस्से सांगून सविस्तर माहिती सांगितली. साहेबांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त शाळेत वेगवेगळ्या गटात विविध स्पर्धा घेण्यात आल्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,यात प्रथम, द्वितीय, तृतीय,येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या वतीने बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करण्यात आले. तसेच एस.एस.सी.परिक्षा मार्च २०२३ मध्ये गुणांनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांची शर्करा तुला करण्यात आली. कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य केशव पाटील नंदनवनकर, सोमनाथ भाऊ हिवाळे, शाळा उभारण्यात यांचा सिंहाचा वाटा होता असे श्री रवी गाडेकर, पर्यवेक्षिका सरोज पवार उपस्थित होत्या.श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खोकडपुरा संभाजीनगर येथील पाच शिक्षक बंधू सेवानिवृत्त झाले. त्यात सर्वश्री प्रा.जे.एम.खान सर.प्रा.बी.डी.राजपूत सर,श्री डी.एन.पाटील सर,श्री पी.बी.बैसाने सर,श्री एस.टी.ढवळे सर या सर्वांचा साहेबांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या वतीने भेट वस्तू देऊन सेवागौरव करण्यात आला. संस्थेचे संचालक श्री जे.एम.खान यांच्या वतीने साहेबांच्या जयंती निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीते साठी सुरेश सुलताने, भगवान वनारसे,संतोष बंडेवार,शिवकुमार होनराव,सुरेश घोरबांड, विजय परदेशी,अशा साळुंखे,सतीश जावळे, तारामती जाधव यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनिल भांड यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका वैशाली सपकाळ यांनी मांडले.प्रमुख पाहुण्याचा परिचय सविता गोसावी यांनी दिला तर सेवानिवृत्त शिक्षकांचा परिचय रमा आडे यांनी दिला.कार्यक्रमाच्या शेवटी आभार ज्योती भालेराव यांनी मांडले. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला.