
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिरादार
नांदेड (मुखेड) दि 3 जुलै
मुखेडच्या आर्य वैश्य मंगल कार्यालयात सेवा सुशासन गरीब कल्याण मोदी @9 महा जनसंपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या संकल्पनेतून दिनांक 3 जुलै रोजी सोमवारी लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यामध्ये मुखेड कंधार -मतदार संघातील 1000 अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस यांचा सन्मान आ. राठोड यांच्याकडून बंधू भेट म्हणून साडी- चोळीचा आहेर देण्यात आला. कागदपत्रे ठेवण्यासाठी एक बॅग त्यात केंद्र शासनाचा योजनेचा पत्रक व राज्य शासन निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट माहिती पुस्तका गुरुपौर्णिमेनिमित्त राठोड परिवार व भाजपातर्फे देण्यात आले. यावेळी राठोड परिवारातील महिलांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी आ. राठोड म्हणाले की
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनेचा लाभ होत असून समाजातील सर्व घटकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत राज्य शासनाकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या काळात शासन स्तरावर प्रयत्न करणार असून विधिमंडळात मागण्या करणार असल्याचे आश्वासन आ डॉ. तुषार राठोड यांनी दिले आहे
उपस्थित.माजी नगराध्यक्ष चक्रवर्ती बाई राठोड, सौ संध्याताई, चव्हाण, देविदास राठोड,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, सौ ज्योत्सना ताई राठोड, पुष्पाताई राठोड, माजी पंचायत समिती सभापती सविताताई खैरकेकर, डॉ. शारदा हिमगिरे,अनिता ताई चोंडीकर, राजश्री ताई राठोड, सुनिताताई राठोड, गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाले, डॉ. उमाकांत बिराजदार, मनोज गौंड, खुशालराव पाटील, अशोक गज्जलवाड डॉ. वीरभद्र हिमगिरे, पंजाबराव पाटील वडजे, हनुमंत वाडीकर, किशोर सिंह चव्हाण, व्यंकट पाटील वसूरकर, दत्ता पाटील, अशोकराव चव्हाण, सुधीर चव्हाण,व्यंकटराव लोबंदे, बबन ठाकूर, किरण पाटील बोडके, करण रोडगे, समीर येजगे, आदी उपस्थित होते…