
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर): दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी प्रथम शिक्षक आई व बाबा यांचा आशीर्वाद घेऊन मामा , भाऊ यांच्या उपस्थिती मधे देगलुर चे भुमीपुत्र डॉ. नरेश आंबादासराव देवणीकर यांनी देगलुर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक पदाचा पदभार स्विकारला . मानव्य विकास विद्यालय देगलुर येथे शालेय व देगलुर महाविदयालयात बारावी पर्यन्त व मुंबई येथे एम डी पॅथोलॉजी पर्यन्त शिक्षण घेऊन तेवीस वर्षे विविध ठिकाणी उत्क्रुष्ट वैद्यकीय सेवा दिली . देगलुर येथे बालपण जाऊन , बारावी पर्यन्त शिक्षण झाल्या मुळे मोठय़ा संख्येने बालमित्रानी मनःपुर्वक स्वागत करून मिठाई भरऊन शुभेच्छा देऊन स्वागत सोहळा उत्साहात साजरा केला .यावेळी डॉ. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले .संतोष उन्ग्रतवारमित्र जयेश यांनी मनोगत व्यक्त केले . नंतर रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी , सिस्टर्स , कर्मचारी यांनी स्वागत सोहळा घेऊन शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन डॉ. लाडके यांनी केले .डॉ. रवि काळे , डॉ. सुनील जाधव , डॉ. मुजीब , छाया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .आमदार जितेश भाऊ अंतापुरकर , लोकनेते अविनाश नीलमवार , सय्यद मौइयौद्दिण , नाना मोरे , सुनील यशमवार , सुमित कांबळे , गजानन कांबळे , साई गन्दपवार , पत्रकार संतोष मनधरने , शशिकांत पटने , अमोल कुमार शिंदे , विनय कांबळे , सुधाकर थड्के यांनी शुभेच्छा दिल्या .मोठ्या संख्येने बाल मित्र परिवार , सर्व स्टाफ , पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी डॉ. नरेश देवनीकर यांनी भूमि पुत्र या नात्याने देगलूर उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या गैरसोई सिटीस्कॅन मशीन डायलेसिस तसेच एक्स-रे विभागाला कमी कर्मचाऱ्यांची संख्या याबाबत लवकरात लवकर वरिष्ठांना बोलून ही जास्तीत जास्त कर्मचारी कशी कार्यरत राहतील यासाठी असे रुग्णांना ज्यास्तीत ज्यास्त सेवा उपलब्ध करून देण्यात येतील असे दैनिक चालू वार्ता पेपर देगलूर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .