
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (लोहा):-श्रीनिवास मंगलकार्यालय लोहा येथे काँग्रेस कमेटीची कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा २०२३ निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. संबंधित आढावा बैठकीत इच्छुक उमेदवाराची नोंद करून घेण्यात आली, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, सदरील निवडणूकी संदर्भात सखोल चर्चा करून संबंधित अध्यक्षासह प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले.
बैठकीचे अध्यक्ष दक्षिण नांदेड आमदार मोहन अण्णा हंबर्डे प्रमुख उपस्थिती एकनाथ उर्फ अनिल मोरे (म.काँगेस प्रदेश प्रतिनिधी), कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे , श्रीनिवास मोरे (महा. काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी), लोहा काँगेस तालुकाध्यक्ष शरद पा पवार, मा जि.प.सदस्य रंगनाथजी भुजबळ गुरूजी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गणेश घोरबांड सर, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष भास्करराव पाटील जोमेगावकर, मा नगरसेवक शहाजी राजे नळगे, लोहा काँग्रेस शहराध्यक्ष व्यंकटेश भाऊ संगेवार, अल्पसंख्याक जिल्हाउपाध्यक्ष अकबर मौलाना साहब, ओबीसी सेलचे अध्यक्ष माणिकराव देवकत्ते, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेफरूद्दीन साहेब, ओबीसी सेल शहराध्यक्ष आंबेकर काका, कंधार तालुका उपाध्यक्ष नागोराव पा मोरे, लोहा न पा मा सभापती पंकज परिहार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब बाबर, कंधार तालुका काँग्रेस सचिव सुरेश कल्हाळीकर, कंधार युवक काँग्रेस शहराध्यक्ष अजय मोरे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष उद्धव पा ढेपे, काँग्रेस शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष रतन सर्जे सर, सेवादलाचे शहराध्यक्ष डी. एन. कांबळे, लोहा काँगेस तालुका सचिव मारोती पा श्रीरामे, प्रकाश पा मोरे, माधवराव पा टर्के, उत्तमराव कापसीकर, मधुकर पा डाकुरे, किशनराव पाटील यासह तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन सतीश देवकत्ते यांनी केलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पा पवार यांनी केले तसेच आभार व्यंकटेश भाऊ संगेवार यांनी मानले.