
दैनिक चालु वार्ता
बीड/अंबाजोगाई प्रतिनिधी किशोर फड
अंबाजोगाई येथे भव्य दहीहंडी उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक सात सप्टेंबर रोजी वंजारी वस्तीगृहात च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे. सदर दहीहंडीचे नियोजन ही गेली सात दिवस चालू आहे .दहीहंडीचे प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये (२१०००₹) असून दहीहंडी ही अंबाजोगाईतील पंचक्रोशीतील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध होत आहे.
दहीहंडी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण अंबाजोगाई पंचक्रोशीतील खेड्यापाड्यातील स्पर्धक सामील होतात व रोमांचक असे थर थरारक पद्धतीने स्पर्धक करताना दिसतात, हृदयाचे ठोके चुकवणारी, रोमांचक व बालकृष्णाचे कृष्णाच्या सुमधुर संगीतात दहीहंडी उत्सव पार पडतो.अशी ही दहीहंडी उत्सव दि.सात सप्टेंबर रोजी आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमाला केज मतदार संघातील विद्यमान आमदार सौ. नमिताताई मुंदडा, केज विधान सभा मतदार संघातील ज्येष्ठ नेते नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा, युवा नेते अक्षय भैया मुंदडा व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे सर्वेसर्वा आयोजक राजकुमार बाळा गायके हे असून त्यांचा मित्रपरिवार गेली सात दिवस अहोरात्र परिश्रम घेताना दिसत आहे.
सदर दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हा स्वतंत्र स्त्री वर्गासाठी व पुरुष वर्गासाठी स्वतंत्र पाहण्याचे नियोजन केले असून अंबाजोगाईतील सर्व नागरिकांनी, बालगोपाळांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष श्री राजकुमार बाळा गायके यांनी केले आहे.