
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर)
श्रीकृष्ण जन्माष्ठमीनिमित्त भक्तापूर रोड येथील विश्व पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी अन् शिक्षिकांनी अत्यंत हर्षोल्हासात दहीहंडी उत्सव साजरा केला. लहान बाळगोपाळ कृष्ण व राधेच्या वेशभूषेत सजवून आली होती. गोविंदा आला रे आलाच्या गाण्यावर उत्साहात नृत्य सादर करून, एकमेकांच्या खांद्यावर थर रचून दहीहंडी फोडली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी एक उपक्रमशील, नाविन्यपूर्ण व आनंददायी पद्धतीने शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधित नावारूपाला आलेल्या विश्व पब्लिक स्कूलमध्ये सातत्याने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पारंपारिक सण, उत्सव, महामानवांच्या जयंती, राष्ट्रीय सण या निमित्ताने विद्यार्थ्यांची भाषणे, गायन, नृत्य असे उपक्रम ठेऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास साधला जातो. याचाच एक भाग म्हणून शाळेतील बाळगोपाळांनी अत्यंत आनंदाच्या वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकही उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या संचालिका आम्रपाली कैलास येसगे, शिक्षिका स्वाती संतोष मनधरने, अनिता श्रीरामे, बबिता रामशेट्टे, जयश्री शिंदे, पुजा आचेगावे, शकुंतला कांबळे, आशाराणी रेड्डी, सिंधू येरपल्ले, महानंदा स्वामी व सहाय्यक संग्राम आकूलवार, जीवन कांबळे यांनी परिश्रम घेतले.