
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर): गोविंदा आला रे आला च्या जयघोषामध्ये सप्तगिरी पोदार लर्न स्कूल देगलूर या सी.बी.एस.ई. शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहांडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासत आला. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतिम म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी के. जी. पासून ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी ‘श्रीकृष्ण व राधा’ यांच्या वेशभुषेमध्ये शाळेमध्ये आले. कार्यक्रमाची सुरूवात स्पेशल परिपाठाने झाली. प्रथमत: शाळेतील वाद्यवृंदाने प्रार्थना सादर केली. त्यानंतर परिपाठात नवीन शब्द सानवी कुलकर्णी, सुविचार स्वरा मिसाळे, सातचा पाढा सौम्या हेगडोळे तर सामान्य ज्ञान गौरी पंतुलवार या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले.
त्यानंतर समुहगीत शाळेतील इयत्ता सातवी तर इयत्ता तिसरीच्या विद्यर्थ्यांनी समुहनृत्य सादर करून उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला.
शेवटी दहीहांडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात हाऊसनुसार इग्नीस हाऊस, ॲक्वा हाऊस, व्हेंटस हाऊस व टेरा हाऊस या चार हाऊसेस मध्ये दहीहांडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये व्हेंटस हाऊसने ही स्पर्धा 30 सेकंदात दहीहांडी फोडून ही स्पर्धा जिकंली. शिक्षक संवाद मालीकेमध्ये शाळेतील सामाजीक शास्त्र विषयाचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर पाटील सर म्हणाले की, श्रीकृष्ण यांनी आपल्या विविध कलामधून जगापुढे एक आदर्श ठेवला श्रीकृष्ण व सुदामाची मैत्री ही जगापुढे आदर्श आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला केलेला उपदेश हा आपल्या जीवनाचा सार आहे. त्यांना प्रेरनादायी गुरू असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
इयत्ता आठवी ते दहावीच्या बालगोपाळांनी दहीहांडीसाठी तीन मनोरे (थर) रचून दहीहांडी फोडण्याचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचन कु. केतकी महाजन व कु. वैष्णवी लोलपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.