
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : जालना जिल्ह्यातील अंरतवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानवी लाठीचार्ज केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत.
या निषेधार्थ गोलेगाव (ता. शिरूर) गावाने बंद पुकारून , स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. या आंदोलनास ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवत चालल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती. मात्र, ते उपोषणावर ठाम होते. याच वेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर, स्त्रियांवर, लहान मुलांवर तसेच वृद्धांवर अंदाधुंद लाठीचार्ज केला. यामुळे गावातील तरुणांनी एकत्रित येऊन सरकारच्या निषेधार्थ गाव बंद पुकारून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असे विद्यमान उपसरपंच निलेश बांदल यांनी सांगितले.
या वेळी शिवाजी कुऱ्हाडे (अध्यक्ष रा. स. पा. शिरूर तालुका )गोलेगावचे विद्यमान उपसरपंच निलेश बांदल,पोलीस पाटील संदीप भोगावाडे,
तंटामुक्ती अध्यक्ष पांडा बांदल.चेअरमन संतोष वर्पे,मेजर सुरेश पडवळ -मा. ग्रा. सदस्य दिलीप लोखंडे, मा ग्रा. सदस्य
अजय वाखारे, तुषार पडवळ( उद्योजाक ),निखिल वाखारे,राजू भोसले,योगेश इंगळे स्वप्नील पडवळ,संदीप बांदल,सचिन वाखारे,
विकास वाखारे,प्रदीप वाखारे,अनिल वाखारे
सुरज माकर,एकनाथ जगदाळे,अक्षय वाखारे
तुलसीदास पवार,मछिंद्र कारंडे,राजेंद्र पडवळ,
सुरज शिंदे,चेतन पडवळ
सुहास पडवळ,संदीप वाखारे,मंगेश वाखारे,
दिलीप भोगावडे,मछिंद्र नाईकरे,भाऊ लांघे,
तुषार जाधव,हरीश भोगावडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी गावात शांती राखण्याचे आवाहन केले. या मोर्चाला दुकानदार व गावातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.