
लेडी प्रकल्पांतर्गत बुडीत गावातील वाढीव कुटुंबास प्रति कुटुंब रु. 3.69 लक्ष अनुदान मंजुर…
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर): मुक्रमाबाद येथील लेंडी प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून प्रलंबित असून या प्रकल्पासाठी अनेक सरकार येऊन गेले पण हा प्रकल्प अजून तयार झाला नाही हे मात्र देगलूर मुखेड तालुक्यातील जनतेचे दुर्दैव समजावे लागेल या
प्रकल्प साठी प्रत्येक सरकारमध्ये या प्रकल्पासाठी बजेट मंजूर होऊन तो बजेट कागदपत्रे राहिला असून मात्र प्रकल्प जैसे थे या परिस्थितीमध्ये असून या प्रकल्पामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेती गेली असून काही शेतकरी तर भूमिहीन झाले आहेत त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचा मोबदला म्हणून सरकारने आर्थिक मदत जाहीर करून पण अनेक वर्षापासून ते मदत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती पण काही दिवसापूर्वीच नव्याने रुजू झालेले देगलूर सहा.
जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तातडीने मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्याशी संपर्क साधून दिनांक 28/04/2023 रोजीच्या पत्रान्वये आदेशित प्रमाणे खालील प्रकल्पग्रस्त गाव असून मौ. रावणगाव भाटापुर, हसनाळ, भेंडेगाव, इटग्याळ प.मु., वळंकी, कोळनुर, भिंगोली, मारजवाडी, भासवाडी, मुक्रमाबाद ता. मुखेड या गावांचा पाठपुरावा करून या लेंडी प्रकल्पग्रस्त मध्ये चार गावांच्या समावेश असून एकुण 1044 लाभार्थ्यांना प्रत्येकी रु 369000/- प्रमाणे एकुण रक्कम रु 385236000/- ( आडतीस कोटी बावन्न लक्ष छत्तीस हजार रु ) वितरीत करण्यात आली असुन उर्वरित गावांचे अनुदान वितरीत करणेचे नियोजन चालू आहे असे पुढील प्रमाणे गाव निहाय अनुदान आले आहे
. रावणगाव ता. मुखेड येथील 519 लाभार्थ्यांना एकुन रक्कम रु 191511000/- ( एकोणवीस
कोटी पंधरा लक्ष अकरा हजार रु केवल) वाढीव कुटुंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. भाटापुर ता. मुखेड येथील 42 लाभार्थ्यांना एकुन रक्कम रु 15498000/- (एक कोटी चोपन्न लक्ष आठ्यान्नव हजार रु केवळ ) वाढीव कुटुंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. हसनाळ ता. मुखेड येथील 255 लाभार्थ्यांना एकुन रक्कम रु 90405000/- (नऊ कोटी चार
लक्ष पाच हजार रु केवळ ) वाढीव कुटुंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
मौ. मारजवाडी ता. मुखेड येथील 228 लाभार्थ्यांना एकुन रक्कम रु 84132000/- (आठ कोटी ऐकेचाळीस लक्ष बत्तीस हजार रु केवळ ) वाढीव कुटुंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. सदर चार गावांच्या एकुण 1044 लाभार्थ्यांना प्रत्येकी रु 369000/- प्रमाणे एकुण रक्कम जमा होईल तसेच उर्वरित गावांचे अनुदान वितरीत करणेचे नियोजन सुरु आहे.
कुलदीप जंगम, सहा. जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी देगलुर यांनी सांगितले त्यांच्या या कार्यामुळे लेंडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण दिसून येत होतो…