
दै.चालू वार्ता उपसंपादक
अवधूत शेंद्रे
वर्धा -आष्टी (श):-येथुन नजीकच असलेल्या अंतोरा येथील बॅंक ऑफ इंडियाचे शाखे अंतर्गत येत असलेल्या अंतोरा (नवीन) येथील म्रुत्यु पावलेल्या महीला वर्षा शरद कोटजावरे यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत सेटल झालेल्या दोन लक्ष रुपये विम्याचा धनादेश म्रुतक महीलेचे पती शरद कोटजावरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.स्वर्गीय वर्षा शरद कोटजावरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लहान आर्वी प्रभागातील अंतोरा (नवीन) येथील दिशा बचत गटाच्या सदस्या होत्या.त्यांच्या मार्फत त्यांचा उमेद प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना विमा काढला होता.म्रुतक महीलेच्या पतीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या विम्याचा त्यांच्या कुटुंबीयांना मोठा हातभार होणार आहे. नुकताच शाखा व्यवस्थापक प्रवीण जलमकर, सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण श्रीरामे, रोखपाल कुणाल जवळेकर तसेच उमेदचे आष्टी तालुका अभियान व्यवस्थापक संदीप कांबळे , माहीती तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण चौधरी , प्रभाग समन्वयक सारिका पेठे , प्रभागासंघ व्यवस्थापक सुनीता केचे , बॅंक सखी छाया महल्ले , प्रेरीका उमा घोरमाडे यांच्या उपस्थितीत म्रुतक महीलेचे वारसदार शरद कोटजावरे यांना दोन लक्ष रूपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी बॅंक व्यवस्थापक प्रविण जळमकर यांचे आभार मानले.