
चालु वार्ता:प्रतिनिधी
अशोक कांबळेगा
रगोटी:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील राजकीय वातावरण गतिशील झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रणशिंग फुकले असून लोकसभा निवडणुकीत कमी झालेले मताची टक्केवारी भरून काढण्यासाठी सूत्रे हलवली जात आहेत.
विधानसभा निवडणूकिसाठी तालुक्यातील प्रमुख उमेदवार हसन मुश्रीफ असणार आहेत. विरोधात समर्जीत घाटगे हे उमेदवार निश्चित उभे राहणार आहेत, मात्र सध्या हसन मुश्रीफ, समर्जीत घाटगे, संजय मंडलिक हे भाजप प्रणित महायुती मध्ये आहेत. त्यामुळे समर्जीत घाटगे निवडणुकीत उभे राहणार हे निश्चित असले तरी ते अपक्ष असणार की कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार हे निश्चित नाही.
दरम्यान शहकाटशहाचे राजकारण आतापासूनच सुरू झाले असून कागल तालुक्यातील गलगले गावातील समर्जीत घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला. याबद्दल सर्वाचा सत्कार नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मयूर बचाराम कांबळे, राजेश बचाराम कांबळे, संजय बचाराम कांबळे, राहुल विठ्ठल कांबळे, विठ्ठल गणपती कांबळे या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी मुश्रीफ म्हणाले
” गेली 35 ते 40 वर्षे मी गोरगरिबांच्या अखंड सेवा करत आहे. गोरगरिबांचे व सर्वसामान्य जनतेचे सतत मला पाठबळ मिळत आहे. गलगलेच्या या प्रमुख कार्यकर्त्यांचा सदैव मानसन्मान ठेवला जाईल. ”
यावेळी काकासाहेब पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.