
दै.चालू वार्ता उपसंपादक आष्टी
अवधूत शेंद्रे
वर्धा – आष्टी(श)नजीकच्या लहान आर्वी येथील भुमीपुत्र तथा प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे संचालक काशिनाथ देशमुख यांचे सुपुत्र प्रा.डाॅ.विकास देशमुख यांची अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांचें कडुन रासेयो अमरावती (ग्रामीण) जिल्हा समन्वयकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
प्रा.डाॅ.विकास देशमुख हे धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागप्रमुख आहे.त्यांनी महविद्यालयात रासेयो मध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी जिल्हा (ग्रामीण) समन्वयकपदी नियुक्ती केली.
प्रा.डाॅ.विकास देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण लहान आर्वी येथील जि.प.उच्च प्राथमिक केन्द्र शाळेत तर माध्यमिक शिक्षण आष्टी येथील हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण श्री समर्थ महाविद्यालय, आष्टी येथे झाले.त्यांची अमरावती (ग्रामीण)जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाल्याने त्यांनी कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते आणि प्राचार्य डॉ विजयकुमार गवई यांचे आभार मानले.तर दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट अध्यक्षा विनाताई मालवीय आणि प्रदीप मिसे यांचे कडुन प्रा.डाॅ.विकास देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.