बि.टी.बी, सब्जी मार्केट भंडाऱ्यात अवैध वसुली
मुख्याधिकारी यांचे तात्काळ वसुली थांबविण्याचे आदेश
======================
दैनिक चालू वार्ता नागपूर उपसंपादक
======================
शंकर सालोडकर
======================
भंडारा = भंडारा येथील आठवडी बाजार हा बडा बाजार येथे भरत असल्याने तिथे येणा-या लोकाना पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा व वाहतुकीस सातत्याने अडचण होत असल्यामुळे नगर परिषद भंडारा यांनी सदर बाजार दुसरीकडे स्थानांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नगर परिषदेला मौजा भंडारा येथील नझुल शिट क्र. ५४ प्लॉट क्र. २०/४ येथील १.५० एकर जागा मिळाली परंतु त्या जागेचा विकास करण्याकरीता नगर परिषदेकडे पैसे नसल्यामुळे सन २०१५ मध्ये सदर जागा हि श्री. बंडू तानाजी बारापात्रे याला काही व अटी व शर्थीच्या आधारे लीज वर देण्यात आली. बंडू बारापात्रे यांनी एक संस्था तयार करून त्याला बिटीबी असे स्वता:चे नावे दिले. तेव्हापासून सदर संस्थांनी तिथे येणारा संपूर्ण शेतकरी वर्ग व भाजीपाला विकत घेणा-या लोकांकडून बाजार मेंटेनन्स च्या नावाखाली साफसफाई, इलेक्ट्रिक, टायलेट बाथरूम सफाई, पाणी पुरवठा इत्यादी खर्च व येणा-या जाणा-या वाहनांकडून गेट पास देऊनन पार्किंगच्या नावाखाली मागील ब-याच वर्षापासून अवैध वसुली करून तो दररोजचे अंदाजे रु. २.०० (अक्षरी रुपये दोन लाख) अवैध वसुली करीत असल्याचे लोकांच्या लक्षात आल्याने त्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकार यांना देण्यात आल्याने त्यांनी त्याची खरी वास्तविकता तपासल्यानंतर सदर संस्था हि दररोज मेंटेनन्स च्या नावाखाली अंदाजे रु. २.०० लाख अवैध वसुली करीत असल्याचे लक्षात आले. सदर बाजारात व्यापारी स्व:ता आपल्या दुकानाचे इलेक्ट्रिक बिल, पाण्याचे बिल व साफसफाई करीत असतात व नगर परिषद साफसफाई करते व कचरा बाहेर घेऊन जाते. त्यामुळे बंडू बारापात्रे याचा खर्च होत नाही मात्र तो विनाकारण इतर लोकांकडून बळजबरीने वेगवेगळे बाजार कर सांगून अवैध वसुली करीत असल्याचे दिसले. तसेच बंडू बारापात्रे हा भाजीपाला विक्रेतेकडून विविध प्रकारचे कर सांगून त्यांच्याकडून बेसुमार वसुली करून त्यांचा हिशेब त्याना देत नाही किंवा तो झालेला खर्च सार्वजनिक सुध्दा करीत नाही. अशाप्रकारे तो विविध मार्गांनी प्रती दिवस रु. २.०० लाख रुपये असे महिन्याला रु. ६०.०० लाख अवैध कमावीत असून लोकांची व शासनाची व नगर परिषदेचे महसूल बुडवून आर्थिक फसवणूक करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिपराज पी. इलमकार यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा यांच्याकडे दिली असल्याने सदर तक्रारीची दखल घेऊन मुख्याधिकारी यांनी दि. १४.०६.२०२४ ला अध्यक्ष, बंडू बारापात्रे, याला मार्केट मध्ये होत असलेलली अवैध वसुली तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकार यांनी बंडू बारापात्रे यांनी नगर परिषदे सोबत केलेल्या करारनामानुसार विविध अटी व शर्थीचे भंग केले असल्यामुळे त्याला परत नव्याने सदर लीज पुढे नुतनिकरण करून देण्यात येऊ नये. तसेच मा. लोहित मतानी, पोलीस अधीक्षक यांनी सुध्दा मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांना श्री. बंडू बारापात्रे हा बिटीबी मार्केट मध्ये अवैध वसुली करून शासनाची फसवणूक करीत असल्याचे दि. १६.११.२०२३ ला पत्र दिले आहे. त्याअनुसंगाने बंडू बारापात्रे व त्याची संस्था मधील सर्व पदाधिकारी व अवैध वसुली करणारे कर्मचारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकार यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा याना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे. यावर मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. तसेच श्री. बंडू तानाजी बारापात्रे याची दि. ३०.०७.२०२४ ला लीज संपत आहे त्यामुळे सदर अवैध वसुली करणारी संस्था व करारनाम्याच्या अटी व शर्थीचे सातत्यानी भंग करणा-या व्यक्तीला नगर परिषदेनी लीज नुतनीकरण करून देण्यात येऊ नये अन्यथा लोकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुध्द मोठा जन आंदोलन उभा करण्यात येईल व त्याकरिता प्रशासन जबाबदार राहील असे सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकार यांनी मुख्याधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.