
दै. चालू वार्ता, पैठण प्रतिनिधी,
तुषार नाटकर-
पैठण : तालुक्यातील श्री चांगदेव विद्यालय चांगतपुरी प्रशालेत नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शालेय पुस्तक देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत या शासनाच्या अभिनव कार्यक्रमांतर्गत नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेची भीती दूर होऊन शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष रामनाथ चोरमले यांनी भूषविले
तर प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब तट्टू, सूर्यकर्ण खेडकर, पांडुरंग नलभे, रमेश नलभे, प्रभाकर राख, मदन खेडकर, नारायण खरात, बळीराम तट्टू, संभाजी वडघणे यांच्यासह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः टाळ्यांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यानंतर सर्वच मान्यवर अध्यक्ष व अतिथी यांचं स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. तदनंतर शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक शिवाजी पवार यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये शैक्षणिक वर्षाची ध्येयधोरणे व गुणवत्ता वाढीसाठी कोणते प्रयत्न करता येईल यांचा लेखाजोखा विद्यार्थ्यासमोर मांडला. तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष रामनाथ चोरमले यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल व शाळेचा दर्जा कसा सुधारता येईल याची सर्वोत्परी शिक्षक, विद्यार्थी, व पालक, या सर्वांनी जबाबदारी घ्यावी
व आपल्या शाळेचा, गावाचा, नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,
विद्यार्थ्यांनी अभ्यास करून खूप मोठे व्हावे अशी, आशा व्यक्त करून आपले भाषण संपवले, त्यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते सर्व नव प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प तसेच शालेय पुस्तके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब राख यांनी केले. व सर्वांचे आभारही व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.