
दै.चालु वार्ता
लोहा, (प्रतिनिधी)
यंदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी आषाढी एकादशी निमित्त वारी मध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचे जे अनूदान देण्याची जी घोषणा केली ती घोषणा म्हणजे तमाम वारकऱ्यांचा अपमान असल्याचे रोहिदास चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
पुढे बोलताना वारकरी रोहिदास चव्हाण म्हणाले की, वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक दिग्गज,दानशूर मंडळी दरवर्षी वारीत लाखो भाविकांवर लाखो करोडो रुपये खर्च करतात.त्यात अन्नदान, मोफत पाणीपुरवठा, मोफत रुग्णसेवा , फळ वाटप तरीही याची वाच्यता कुठेही करत नाहीत परंतु अधिकृत, नोंदणीकृत आषाढी वारीतील असलेल्या दिंड्यांना वीस हजाराच्या अनुदानाची घोषणा करून तमाम वारकरी संप्रदायाचा वारकऱ्यांचा अवमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केला असल्याचे ते म्हणाले.
भागवत तथा वारकरी संप्रदायातील रोहिदास चव्हाण हे १९८० पासूनचे वारकरी.आजतागायत न चुकता मनोभावे आषाढी वारीतील दिंडीत अजूनही सपत्नीक सहभागी होऊन विठ्ठल नामात तल्लीन होतात.अन्नदान करतात, वारकऱ्यांची सेवा ही देण त्यांना पुर्वी पासुनच वडील कै.खोब्राजी पाटील चव्हाण यांच्या असलेल्या विठ्ठल भक्ती मुळे, संस्कारामुळे,सुसंस्कृत घराण्यामुळे,वडीलोपार्जित शिकवणी मुळे असल्याचे दिसून येते.अजूनही ते वारकऱ्यांना जपतात, मदतीचा हात पुढे करतात, वर्षभरात सप्ताह, किर्तन, पोथी, शक्ती,आरती विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवतात.समाजसेवा,भगवंताची सेवा, नाही रे वाल्यांची सेवा हे त्यांचे विशेष होय.
तसेच मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे तमाम वारकऱ्यांचा अवमान अशी प्रतिक्रिया उमटत असतानाच वारकरी असलेले रोहीदास चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या केलेल्या घोषणेचा आपल्या भावना व्यक्त करत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुदानाच्या घोषणामुळे तमाम वारकरी संप्रदायात तीव्र पडसाद उमटत आहेत.सरकारचे काम हे जनतेला सुख सुविधा देणे त्यात रस्ते,पाणी, दिवाबत्ती, शौचालय आदी अत्यावश्यक बाबींचा पुरवठा करणे हे असून तसेच वारकऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यात सरकार का हयगय करत आहे? असेही वारकरी रोहिदास चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले.