
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी
श्री हाणमंत जी सोमवारे
लातूर जिल्हा अहमदपूर:-
शहरातील परांडे कोचिंग क्लासेसमधील विध्यार्थ्यांनी सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व शालेय स्पर्धापरीक्षेत जसे की, शिष्यवृत्ती,जवाहर नवोदय, मंथन MTSE अश्या सर्व परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी इ.5 वी वर्गातील 15 विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत तर जवाहर नवोदय विद्यालयासाठी शहरी मधून श्रद्धा खडके या विध्यार्थिनीची निवड झाली आहे आणी या निमित्ताने क्लासेसच्या वतीने आज रोजी विध्यार्थ्यांना गुणगौरव आणी बक्षीस वितरण करण्यात आले आजच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून पु. अहिल्यादेवी माध्यमिक व उच्यमाध्यमिक विद्यालय सांगवी चे प्रा. श्री.मुळे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे प्रा. श्री.शिंदे सर हे होते. प्राविण्य् मिळविलेल्या सर्व विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते 3 गोल्ड, 7 शिल्वर, 4 ब्रॉंझ आणी गुणपत्रक असे बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी कार्यकर्माचे अध्यक्ष म्हणून श्री. मूळे सरांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर क्लासेसच्या वतीने श्री.परांडे सरांनी विध्यार्थ्यांचे कैुतुक केले या कार्यकर्माचे सुत्र संचलन श्री.सुनील शिंदे सर यांनी केले तर कार्यक्रमांसाठी आलेल्या सर्व पालकांचे आभार सौ. परांडे मॅडम यांनी मानले…