
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो. नी .पवन चौधरी याना पोलीस निरीक्षक पदी बढती मिळून त्यांची बदली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नेमणूक झाल्याचे तर म्हसळा पोलीस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये पवन चौधरी यानी काम करताना गोवंश चोरी व हत्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांचा फर्दापाश मोठ्या प्रमाणात करून गोवशाची सुटका केल्याबद्दल म्हसळा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील यानीआणि पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.