
१० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दिग्रस:प्रतिनिधि
दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून ५० किलो गोवंश मास आणि इतर साहित्य असा एकूण १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मो. याकूब मो. इसा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. ही कार्यवाही दि. ३ जुलै रोजी दिग्रस पोलिसांनी केली. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार दिग्रस पोलीस कलगाव परिसरात पेट्रोलीग करत असतांना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती कलगाव येथे गोवंशाची हत्या करून मास विक्री करत आहे. त्या माहितीच्या आधारे दिग्रस पोलिसानी कलगाव येथे धाड टाकून ५० किलो गोवंशाचे मास, वजन काटा आणि धारधार सुरी असा एकूण १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मासाची वैद्यकीय तपासणी साठी पशु वैद्यकीय अधिकारी यांना दिग्रस पोलिस ठाण्यात बोलावून सदर मांसाचे परीक्षणासाठी मासाचा तुकडा अमरावती येथे पाठविण्यात आला. व उर्वरित मास न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आले. या प्रकरणी मो. याकूब मो. इसा वय-३२ रा. कलगाव याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी अधिनियम १९७६ चे कलम ५ ब, ५ क, ९ अ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निलेश गायकवाड, नारायण लोंढे, दिलीप राठोड, केशव चव्हाण, सुजित जाधव, सोनाली हनवते, रुपवंती नरवटे यांनी केली आहे.