
दैनिक चालु वार्ता,
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे सर्पमित्राच्याच घरी एक ‘रसल कुकरी’ हा दुर्मीळ साप आढळला. सर्पमित्र अमित अडसूळ यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडुन दिले असले तरी अशा प्रकारचा साप प्रथमच आढळल्याने निमसाखर परिसरात तो कुतुहलाचा विषय झाला आहे.
सर्पमित्र व वन्यजीव संरक्षण संस्था चे उपाध्यक्ष म्हणुन अमित अडसूळ गेली अनेक वर्षांपासून काम करत आहेत.नुकतेच सकाळवेळी नित्तनियमाप्रमाणे आडसुळ हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते.काही वेळातच घाबरलेल्या अवस्थेत आडसूळ यांच्या लहान मुलीचा घरामध्ये साप आल्याचे लगेच वडिलांना फोन करून सांगीतले.
यावेळी या सापाचे निरीक्षण केले असता ‘रसेल कुकरी’ हा साप दुर्मीळ असून निमसाखर परिसरामध्ये प्रथमच आढळला आहे. हा साप बिनविषारी गटातील असून याची सरासरी लांबी १.६ इंच आहे. या सापाच्या मानेवर उलटा ‘व्ही’ अक्षराची खुण असुन सापाचे पोट पांढरट किंवा फिकट पिवळसर आहे.रसेल कुकरीचे शरीर सडपातळ व शेपुट आखुड असते. साधारण या सर्वांचा एप्रिल महिन्यादरम्यान या सापांचा प्रजनन काळ असुन एक मादी ५ ते ९ अंडी घालते. लहान-लहान सरपटणारे प्राणी, किटक व त्यांची अंडी या सापाचे खाद्य असते. हा साप अंत्यंत शांत स्वभावाचा समजला जातो. मात्र, जर कधी हल्ला करायचा असेल तर, तो शरीर फुगवून हल्ला करतो, तसेच माझ्या वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये निमसाखर परिसरामध्ये प्रथमच हा साप पकडला असल्याची माहिती सर्पमित्र अमित अडसूळ यांनी दिली.
पुढे बोलताना आपल्या परिसरात जखमी जंगली प्राणी साप तसेच जखमी पक्षी अढळल्यास वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन अमित अडसूळ यांनी केले आहे.