
केज मतदारसंघात केलेल्या विकास कामामुळे नमिताताई मुंदडा भरघोष मताने निवडुन येणार!- डाॅ.वसुदेव नेहरकर
दै.चालु वार्ता
केज प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात ऊमेदवारीवरुन घमसान सुरु असताना भाजपाच्या पहिल्याच यादीत केज विधानसभा मतदार संघाची ऊमेदवारी आ.नमिता मुंदडा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बीड जिल्हातुन एकमेव भाजपाने आ.नमिता मुंदडा यांनी केलेल्या जनहिताच्या कामामुळे व पक्ष बळकटीसाठी दिलेल्या योगदानाने संधी मिळालेली आहे. केज मतदार संघात अंबाजोगाई,केज व बीड तालुक्यातील काही भाग येतो.केज मतदार संघात नंदकीशोर मुंदडा यांनी दवाखान्यातील कुठलेही पेशेंटची अडचण असो,शेतकरी यांचे शेतातील फीडर असो,जळालेली रोहीत दुरुस्त करणे असो,लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन मंजुर करुन घेतलेले आहेत.केज मतदार संघात नंदकीशोर मुदंडा व अक्षय मुंदडा हे प्रत्येक मतदार पर्यंत पोहोचलेले आहेत.वैयत्कीय व सार्वजनिक विकासाची कामे तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबविले आहेत.
आ.नमिता मुंदडा यांनी केज मतदार संघातील केज,अंबाजोगाई व नेकनुर परीसरातील बैठक शनिवार (दि.19/10/2024) रोजी अंबाजोगाईतील आई या निवासस्थानी घेतली.या बैठकीत गेल्या पाच केलेल्या विविध विकास कामांचा अढावा घेण्यात आला.महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर विविध गावांना व शहरांना विकास निधी पोहचण्याचे काम आ.नमिता मुंदडा यांनी केले असुन महायुती सरकाने देखील केज मतदार संघासाठी भरीव निधी दिलेला असुन सरकाने दिलेल्या योजनांची माहीती मतदारांपर्यंत पोहचावी.व शेवटच्या सामान्य माणसांसाठी केलेल्या कांमाची माहीती द्यावी असे अवाहान आ.नमिता मुंदडा यांनी केले आहे.