दै.चालु वार्ता
केज प्रतिनीधी-कीशोर गरुड
केज विधानसभा मतदारसंघातून पप्पू कागदे यांना महायुतीची उमेदवारी घोषित होईल अशी आशा आंबेडकरी जनतेमध्ये होती .मागील 5वर्षात महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला महायुती सत्तेवर असतानाही दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष असतानाही केज विधानसभेसाठी मा. रामदास आठवले पप्पू कागदें साठी आग्रही असतानाही केजची उमेदवारी डावलण्यात आल्यामुळे केज मतदार संघात प्रचंड नाराजी पसरली आहे.भाजप रिपब्लिकन पक्षाचा केवळ निवडणुका पुरता वापर करत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.केज मतदार संघात महायुतीचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते करणार नाहीत केजच्या उमेदवारी बाबत भाजपने पुनर्विचार करावा अन्यथा केज विधानसभेची निवडणूक पप्पू कागदें यांनी लढवून अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करून आंबेडकरी जनतेस न्याय द्यावा हीच सर्वसामान्य मतदारांची भावना आहे.