
राज्यात नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी काल महायुतीतल्या नेत्यांनी केली.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
एका बाजूला हि जय्यत तयारी सुरु असताना आता दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा झाली. यावेळी कोण-कोणती मंत्रिपदे दिली जाणार, याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच गृहमंत्रिपदाचे काय करायचे यावरही चर्चा झाली.
एकनाथ शिदें (Eknath Shinde) यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला. तर भाजपकडून गृहमंत्रिपदाचा दावा सोडणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. आहे. विशेष म्हणजे शिंदेंना गृहखात्याऐवजी नगरविकास आणि एक महत्त्वाचे खाते दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. शिंदेंनी ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णयही घेतला आहे.