
कारण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत
साप पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहेत. सापांच्या काही विषारी प्रजाती अशा आहेत ज्यांच्या दंशामुळे माणूस किंवा प्राणी काही मिनिटांत किंवा सेकंदात मरू शकतात. मात्र, जर सापाचे विष कोणत्याही माणसाच्या शरीरात पसरले, तर त्याला थांबवण्यासाठी सापाचे विषच उपयोगी ठरते.
याला आपण वैज्ञानिक भाषेत अँटीडोट किंवा प्रतिविष म्हणतो. ते कसे तयार होते, ते जाणून घेऊया…
सापाचे विषच का आवश्यक आहे?
सापांच्या तोंडात वेगवेगळ्या प्रकारचे विष असते, जसे की थुंकी. हे विष त्यांना शिकार पकडण्यास आणि स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करते. तैपान आणि किंग कोब्रासारख्या काही सापांचे विष खूप धोकादायक असते. त्यांचे विष इतके विषारी असते की, माणूस किंवा प्राणी काही सेकंदात मरू शकतो. कोब्राचे विष आपल्या मेंदूवर परिणाम करते, तर व्हायपर सापाचे विष आपले रक्त खराब करते. सापाच्या दंश झाल्यास, एक विशेष औषध दिले जाते ज्याला अँटी-व्हेनम म्हणतात. हे औषध सापाच्या विषाचा प्रभाव नष्ट करते.
घोड्यांपासून अँटीडोट कशी तयार करतात?
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, जेव्हा साप कुणाला दंश करतो, तेव्हा त्याचे विष संपूर्ण शरीरात पसरते आणि जीवला धोका निर्माण करतो. या धोक्यावर मात करण्यासाठी डॉक्टर अँटी-व्हेनम नावाचे एक विशेष औषध देतात. हे औषध घोड्यांच्या मदतीने तयार केले जाते. सापाचे विष नियंत्रित पद्धतीने आणि कमी प्रमाणात घोड्यांना दिले जाते. मग घोड्याच्या शरीरात एक अँटीबॉडी तयार होते, जी सापाच्या विषाला निष्प्रभ करते. हेच औषध आपल्याला दिले जाते.
घोड्याच्या प्लाझ्मापासून अँटी तयार होते
सापाच्या विषाविरुद्ध अँटीबॉडीज असलेला प्लाझ्मा मिळवण्यासाठी, घोड्यांच्या रक्तामधून प्लाझ्मा वेगळा केला जातो. हा प्लाझ्मा नंतर मानवी उपचारांसाठी योग्य बनवण्याकरिता एक किचकट प्रक्रियेतून काढला जातो. घोड्यांची शक्तिशाली रोगप्रतिकारशक्ती त्यांना कमी प्रमाणात विष सहन करण्यास आणि अँटीबॉडीज तयार करण्यास सक्षम करते. अशा प्रकारे, घोडे अँटीव्हेनम उत्पादनासाठी आदर्श प्राणी आहेत. ज्या भागात सापांचे दंश सामान्य आहेत, तेथील लोकांसाठी ही प्रक्रिया विशेष महत्त्वाची आहे.