
वाल्मिक कराडवर मनोज जरांगे यांचा हल्लाबोल,आरोपींच्या बाजूने मोर्चे..
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू केले आहे. यावेळी मोनज जरांगे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत बोलताना वाल्मिक कराडवर हल्लाबोल केला तसेच या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांवर देखील गंभी आरोप केले आहेत.
आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होतयं. हे मोर्चे का निघाले? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील. मुख्यमंत्री मराठ्यांच्या बाजूने असतील तर ते योग्य निर्णय घेतील. मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतल्यावर दूध का दूध पाणी का पाणी होईल.
कुणाचा बाप आला तरी संतोष देखमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. धनंजय देशमुख यांंना देखील धमक्या येऊ लागल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात सगळ काही उघड असताना संबधितांना सहआरोपी का केले जात नाही? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.
सध्या पोलिस यंत्रणांनी सर्व ठिकाणचे CCTV फुटेज तपासले पाहिजेत. वाल्मिक कराडला ICU मध्ये का ठेवण्यात आले आहे. जेल मध्ये उपचाराची व्यवस्था नाही का? रुग्णालयातील देखील CCTV फुटेज तपासले पाहिजेत. ज्याच्या नावावर मालमत्ता आहे त्या सर्वांची ED चौकशी झाली पाहिजे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. राज्यात पहिल्यांदाच असं होतोय आरोपींच्या बाजूने मोर्चे निघत आहेत. पोलिस आरोपींनी पाठिशी घालत आहेत. राजकीय स्वार्थासाठी छगन भुजबळ OBC समाजाचा वापर करत आहेत अशी टीका देखील मनोज जरांगे यांनी केली.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. सगेसोयरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी करा असा मागण्या मनोज जरांगे यांनी सरकारकडं केल्या आहेत. हैदराबाद गॅजेट लागू करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. तर महायुती सरकारने मराठा सरकारला न्याय देण्याचं काम केल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. तरीही मनोज जरांगेंचं समाधान होत नसेल तर आपण काही करू शकत नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.