
रात्री 8.34 वाजता अमिताभ यांची पोस्ट, चाहते चिंतेत
अभिनेते अमिताभ बच्चन कोन बनेगा करोडपती या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अमिताभ बॉलिवूडमधील असे अभिनेते आहेत जे आज वयाच्या 82व्या वर्षी देखील काम करत आहेत. त्याचबरोबर ते नव्या पिढीबरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय असतात. काम करण्याबरोबरच ते त्यांचे डेली ब्लॉग देखील शेअर करत असतात. त्याच्या नुकत्याच शेअर केलेल्या एक्सवरील पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अमिताभ बच्चन खूप व्यस्त असतील, पण ते दररोज त्यांच्या ब्लॉग आणि ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त करतात. काही तासांआधी त्यांनी केलेलं ट्विट वाचून त्यांचे चाहते घाबरले आहेत. त्यांना नेमकं काय झालंय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
बिग बींनी ट्विटमध्ये काय लिहिलं?
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8.34 वाजता एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, ‘जाण्याची वेळ आली आहे.’ हे ट्विट पाहून चाहते नाराज झाले. एका चाहत्याने लिहिले, ‘असं बोलू नका साहेब.’ दुसऱ्या चाहत्याने विचारले, ‘काय झाले साहेब?’ दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट केले, ‘सरजी, तुम्ही जे लिहित आहात त्याचा अर्थ काय?’
बिग बींच्या ट्विटने चाहते नाराज
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये हे स्पष्ट केले नाही की त्यांनी जाण्याबद्दल कोणत्या संदर्भात लिहिले आहे किंवा ते कशाबद्दल बोलत आहेत. पण या ट्विटनंतर चाहत्यांची चिंता वाढली आहे आणि नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.
अमिताभ बच्चन त्यांच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास पोस्ट शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसाठी त्याच्या बर्थडे निमित्ताने पोस्ट लिहिली होती. त्यांनी अभिषेकचा बालपणीचा फोटो शेअर केला. अभिषेकच्या जन्माच्या वेळी काढलेले आहे. मग अभिषेक बच्चनला इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले आणि अमिताभ मॅटरनिटी वॉर्डमध्ये उभे राहून त्याच्याकडे पाहत होते.
बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती 16’ होस्ट करत आहेत. त्याआधी ते 2024 मध्ये रजनीकांत यांच्याबरोबर ‘वेट्टियां’ सिनेमात दिसले होते. सध्या त्याने कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही. पण नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण सिनेमात ते दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.