
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : कर्णकश आवाज काढत फटाक्यांसारखा मात्र, कानठाळ्या बसविणाऱ्या त्या बुलेटस्वारांवर शिरूर वाहतूक पोलिसांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात धडक कारवाई सुरू केली असून, वेगवेगळ्या भागात कारवाई करुन जप्त केलेल्या ३५ सायलेन्सरवर बुलडोझर चालविला आहे.पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी कौतूक केले असून, यापुढे ही अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले .
त्या अनुशंगाने वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलीस अंमलदार विकी मैंद यांचे पथक तयार केले.
शहरात रात्री-अपरात्री भरधाव वेगाने बुलेटचालक तरूण जातात. त्यांच्या दुचाकीचा वेग देखील भरधाव असतो. तर गाडीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार (मॉडिफाय) करून त्यातून फटाक्यासारखा आवाज काढला जातो. या फटाक्यासारख्या आवाजाने ज्येष्ठ नागरिकांसह सर्व सामान्य नागरिकांना त्रास होतो. अचानक आवाज आल्यानंतर लहान मुल, महिला व ज्येष्ठ नागरिक घाबरतात देखील. परंतु, त्याचीच मजा घेत हे तरुण शहरात सुसाट सुटलेले पाहायला मिळतात. पंधरा ते वीस दिवसांपासून पोलिसांनी शहरातील कॉलेज, बस स्टॅन्ड, गर्दीच्या ठिकाणी बुलेटचालकांवर कारवाई करुन त्यांचे सायलेन्सर जप्त केले.त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या ३५ सायलेन्सरवर ‘बुलडोझर’ चालवून नष्ट केले.
शिरूर पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण भागामधील चार चाकी वाहनांचे काळया काचांचे फिल्मींग असल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गाडीच्या काचेचे फिल्मीग जागेवरच फाडण्यात येणार आहेत.
– संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन.