
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील थोडगा रोडवरिल रेड्डी कॉम्प्लेक्स येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कुणाच्या आमिषाला बळी न पडता 80 टक्के समाजकारण 20% राजकारण करण्याचं काम आपण सतत चालू ठेवावे आज सध्याचे अपयश दिसत असले तरीही खचून न जाता अपयश हीच यशाची पायरी असते असे जिल्हा संपर्क प्रमुख, मा.आमदार रोहिदासजी चव्हाण साहेब यांनी शिवसेना कार्यालय थोडगा रोड अहमदपूर येथे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीत आपले मत मांडले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष रोडगे, नगरसेवक संदीप चौधरी, शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले सहसचिव पद्माकर पेंढारकर, शिवनेरी कार्यालय थोडगा रोड अहमदपूर येथे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण साहेब म्हणाले की शिवसैनिकांनी व पदाधिकारी यांनी शिवसैनिक हाच शिवसेनेचा मूळ पाया आहे. त्यामुळे पदाधिकारी अमिषाला बळी पडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत असतील तर त्याही ठिकाणी त्यांना निराशाच येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक कुठेही गेलेला नसून तो जशाच्या तसे उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्यामुळे अपयश हे आपल्याला येणार नाही. आज आलेल अपयश हे उद्याची यशाची पायरी आहे. असे मत माजी आमदार चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित शिवसेना उप तालुका प्रमुख लहू बारवाड, संतोष अधटराव, सर्कल प्रमुख सोमनाथ आढाव, सुरेश अंकुलगे सिद्धेश्वर औरादे , गजानन यन्ने , पत्रकार बालाजी काळे, उपशहर प्रमुख शिवकुमार बेंद्रे, गणेश राठोड, कालिदास धुळगुंडे, सचिन खंदाडे, संतोष सूर्यवंशी, विठ्ठल वगे, वैभव देशपांडे, विठ्ठल भोगे , सोमनाथ हरगिले, व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.