
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव :
श्रीक्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या एक अध्यक्ष व सहा विश्वस्तांची निवडणूक प्रक्रिया सोमवार ( ता ३१ ) मार्च रोजी येथील पित्ती धर्मशाळेत पार पडली.या निवडणुकीत हभप जालिंदर विश्वनाथ मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली तर वैभव अशोक मोरे ,विक्रमसिंह उमराज मोरे ,दिलीप नारायण मोरे, लक्ष्मण दत्तात्रय मोरे ,उमेश सुरेश मोरे ,आणि गणेश उत्तम मोरे यांची विश्वस्तपदी निवड झाली.
संस्थानच्या आबाजीबुवा ,गणेशबुवा आणि गोविंदबुवा आशा तीन शाखा आहेत.या तीन शाखेतून प्रत्येकी दोन असे सहा विश्वसतांसाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. शाखेतून दोन वर्षासाठी हभप जालिंदर विश्वनाथ मोरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या नंतर निवडून आलेले सहा विश्वस्त , नवनिर्वाचित अध्यक्ष हे दोन वर्षे तर सहा विश्ववस्त हे पुढील सहा वर्षे देहू देवस्थान संस्थानचा कारभार संभाळणार आहेत.
आबाजीबुवा शाखेतून ९०, गणेशबुवा शाखेतून १४१ आणि गणेशबुवा शाखेतून १४७ असे एकूण ३७८ पैकी ३५५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एक अध्यक्षपदासाठी ३, तर ६ विश्वस्तपदासाठी असे एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
आबाजीबुवा शाखा
विक्रम मोरे ,भास्कर मोरे ,दिलीप मोरे ,जयंत मोरे ,अमोल मोरे ,लक्ष्मण मोरे या सहा उमेदवारांच्या मधून हभप दिलीप नारायण मोरे व लक्ष्मण दत्तात्रय मोरे हे दोघे विजयी झाले.
गणेशबुवा शाखा
विदयमान विश्वस्त अजित मोरे ,श्रीराम मोरे ,धनंजय मोरे ,उमेश मोरे ,सचिन मोरे गणेश मोरे .या सहा उमेंद्वारांच्या मधून हभप उमेश सुरेश मोरे व गणेश उत्तम मोरे हे दोघे विजयी झाले.
गोविंदबुवा शाखा
विध्यमान विश्वस्त ,संजय मोरे ,विक्रमसिंग मोरे ,अशोक मोरे ,जयसिंग मोरे ,वैभव मोरे ,रोहन मोरे ,विवेक मोरे या पैकी वैभव अशोक मोरे व विक्रमसिंह उमराज मोरे हे विजयी झाले.
ही निवडणूक प्रक्रिया सोमवार ( ता.३१ ) मार्च रोजी येथील पित्ती धर्मशाळेत सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडली. सायंकाळी ६ नंतर मतमोजणी होऊन निवडून आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून अंकुश बाळकृष्ण मोरे ,सहायक निवडणूक अधिकारी ,सुजित बाळकृष्ण मोरे आणि शामकांत एकनाथ मोरे यांनी काम पाहिले.