
दैनिक चालु वार्ता कारंजा लाड – अशोकराव उपाध्ये
हिंदू मुस्लीम जातीय एकोपा असावा; आपसी बंधूभाव वाढीस लागून प्रेम; सतभावना; सहकार्य या मुल्यांची वृद्धी व्हावी करीता काजळेश्वर येथील सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष शे मुजक्कीर भाई शे मुरसलीम यांचे निवासस्थानी खिरखुरमा कार्यक्रमाचे आयोजन दि.१ एप्रील रोजी करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रमुख स्थानी मो शरफोद्यीन जनाब तर प्रमुख उपस्थितीत सरपंच नितीन पाटील उपाध्ये; तंटा मुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्ये; ठेकेदार सलीम शेठ; खवि.संचालक विनोद पा उपाध्ये; सोसायटी संचालक डॉ . मुल्लाजी; गजानन भड; माजी उपसरपंच नारायण कोंडू जाधव; माजी सरपंच शे मुन्तजीम; हाजी मुजम्मील बाबा भाई; राजेगृप प्रमुख ओमप्रकाश वानखडे; सुभाष उपाध्ये; गुरुदेव प्रेमी दिलीप गावंडे ;शोएब; सोनु अब्रार भाई; घनश्याम गावंडे यांची प्रमुख उपस्थीती होती . उपस्थितांनी एकमेकांना ईदीच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला .सर्वाना खिरखुरमा देण्यात आला . उपस्थितांचे आभार मुजक्कीर भाई यांनी मानलेत .