
दैनिक चालु वार्ता कारंजा लाड प्रतिनीधी – अशोकराव उपाध्ये
अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रात संत गाडगेबाबाच्या दुर्मीळ चित्रांची प्रदर्शनी व गाडगे बाबांच्या जीवनावर लीहीलेल्या पुस्तकाचे विमोचन नुकतेच कुलगुरु डॉ मिलींद बाराहाते यांचे हस्ते संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ अकोट संस्थानचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांचे प्रमुख उपस्थीतीत केले .
याप्रसंगी अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटल अमरावतीचे अध्यक्ष डॉ अनिल सावरकर; सुखदेवजी भुतडा ;अकोला प्रभारी कुलगुरु डॉ महेंद्र ढोरे; कुलसचिव डॉ अवीनाश असनारे; डॉ भैया साहेब मेटकर सदस्य व्यवस्थापन समीती; प्रकाश साबळे ;माजी प्रभारी कुलगुरू डॉ जामोदे; डॉ गुणवंत उहाणे; पाशे बंद इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थीत होते . आमले व किशोर अब्रु लीखीत गाडगेबाबा जीवनपट यापुस्तकाचे विमोचन यावेळी मान्यवरांचे उपस्थीतीत करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजक डॉ . दिलीपराव काळे यांनी प्रास्तावीक केले . याप्रसंगी उपस्थितांनी संत गाडगे बाबा यांच्या दुर्मीळ छाया चित्राचे अवलोकन उपस्थीतांनी केले . डॉ दिलीपराव काळे अध्यासी प्रमुख संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र अमरावती यांचे कार्यक्रम आयोजन व संत गाडगेबाबा प्रेमी अनुयायी यांना एकत्रीत करून कार्यक्रम नियोजनबध्द यशस्वीते करीता उपस्थीतांनी कौतूक केले . सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली .