
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी उमरगा-शिवराज पाटील
धाराशिव उमरगा गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच गुढी उभारली जात असताना, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात असताना उमरग्यातील व्ही एस ए ग्रुपच्या वतीने युवा हॉटेल व्यवसायिक विशाल कटके यांनी एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहातील अनाथ मुलांसमवेत पाडवा साजरा केला. या अनाथ मतिमंद मुलांच्या जीवनात आनंददायी ‘गुढी’ उभारण्याचा प्रयत्न केला गेला यावेळी मराठी नववर्षाची इतकी आनंददायी सुरुवात पाहून अनाथ मुलेही भारावून गेली होती.
‘व्ही एस ए’ ग्रुप हा एक सामाजिक ग्रुप असून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती आपले दायित्व दाखवण्याचा प्रयत्न ग्रुप चे अध्यक्ष विशाल कटके हे सातत्याने करीत असतात. कधी वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणतात, तर कधी फूटपाथ वर मुक्काम करणाऱ्या बेघर बेसहारा मनोरुग्नाना त्यांस नकळत पिशवीमध्ये वेगवेगळे खाऊ व कपडे, ब्लॅंकेट अलगद ठेवले जाते.
हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त असून या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते.घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो. गुढीची मनोभावे पूजा केली आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो,आणि याच गुढीपाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरगा शहारातील एक युवा हॉटेल व्यवसायिक विशाल कटके यांनी आपल्या मित्र परिवारासोबत एकुरगावाडी येथील आनाथ मतिमंद बालगृहात जाऊन सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रेमाने आपुलकीने.. सहानुभूतीपूर्वक अनाथ मुलाच्या हस्ते केक कापून, सर्व मतिमंद मुलांना मिठाई व गोड धोड खाऊ घातले आणि सर्वांच्या गळ्यात पारंपरिक साखरेच्या गाठीचे गोड हार घातले आणि भोजन वाढले.
यावेळी प्रभात हॉटेल चे युवा व्यवसायिक विशाल कटके यांच्यासह रणजित कटके, अमोल ठाकूर, अरुण इंगळे, डॉ सुरज मोरे,शुभम थोरे, महेश सोलंकर, दिपक बिराजदार, रितेश कटके, आकाश कांबळे, रोहन शिंदे,सचिव आकशे,अशोक माळी,आण्णासाहेब पवार, रोहित गायकवाड, राजु सक्करगे, अजय चव्हाण, विशाल चव्हाण, ओमकार शेळके,आकाश भोसले,मनोज भोसले, सुमित चव्हाण,सचिन कटके, अनाथ बालगृहाचे मुख्याध्यापक बालाजी शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.