
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शिवराज पाटील
धाराशिव( उमरगा )दिनांक ४/४/२०२५ रोजी दुपारी ११ वाजता. स्थळ :- छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
माकणी येथे मातंग समाजाच्या परिवाराला भर चौकात मारहाण करणाऱ्या गाव गुंडाच्या निषेधार्थ व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे तसेच सदरील गाव गुंडाच्या दहशतीमुळे भयभीत झालेल्या कुटुंबाला पोलीस बंदोबस्त देण्यात यावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना लोहारा तालुका अध्यक्ष श्रीरंग भाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी प्रमुख उपस्थिती मा. शिवाजी भाऊ गायकवाड (प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष धाराशिव), मा. दिलीप बापू गायकवाड (प्रदेश सचिव), मा. राजाभाऊ शिंदे (मराठवाडा उपाध्यक्ष), मा. विजय भाऊ तोरडकर (उमरगा तालुका अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी या भव्य रस्ता रोको आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे… जय लहुजी!