
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या ‘अजितपर्व- पदाधिकारी संपर्क अभियानांतर्गत पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या नेतृत्वात दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर ओबीसी विभाग नांदेड महानगर, दक्षिण विभाग व उत्तर विभाग जिल्हा कार्यकारणीची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक बांधणीविषयी सूचना करून मजबूत संघटना बांधणी करण्याच्या सूचना मा. आखाडे यांनी दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी मंत्री . भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, पक्ष वाढीच्यासाठी सर्व समाज घटक पक्षासोबत जोडणे आवश्यक असून त्या दृष्टीने ओबीसी विभागाच्या वतीने ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी सुरू असलेली मोहीम पक्षाला बळकट करणारी ठरेल.
यावेळी माजी आमदार ओमप्रकाशजी पोखर्णा व माजी आमदार . मोहनराव हंबर्डे, माजी महापौर सरजितसिंग गिल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस . प्रविणजी पाटील चिखलीकर तसेच नांदेड दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, महानगर कार्याध्यक्ष फेरोज पटेल यांच्यासह पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. उत्तमराव सोनकांबळे, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील गौड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गंगाधरजी भांगे व सुरेश राठोड, प्रदेश चिटणीस बच्चू यादव, सहकार सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब शेळके, ओबीसी विभागाचे नांदेड दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष प्रभाकर फांझेवाड, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष आनंद डांगे, महानगर जिल्हाध्यक्ष प्रा. मारोती शितळे, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदाताई जोगदंड, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अॅड. सोनकांबळे, माजी युवक जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमीरे, असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, युवक प्रदेश सचिव तेजिंदरसिंह ढाकणीवाले, राजेश्वर देशमुख व स्वराताई मराठे आदी प्रमुख मान्यवरांसह ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.